Tuesday, September 7, 2010

उषा


दवबिंदुंना चुंबुन घ्यावे

आज उषेला का वाटे?
तिच्यासारख्या रूपमतीला
साजेसे कोणी भेटे?
          प्रीतीची पाऊले लगोलग
          पडावयाची ठरलेली
          सकाळ वेळा टळली तरीही
          त्याच्यातच रमलेली
विस्मय करिती लोक
भूवरी पक्षी गडबडले
म्हणती सारे अजूनही
कसे नाही उजाडले?

1 comment:

  1. नमस्कार,
    आपला ब्लॉग मोगरा फुललासोबत http://www.mogaraafulalaa.com/2010/04/marathi-bloggers-2.html या लिंकवर जोडला गेला आहे.

    आपल्या कविता छान आहेत. जर दोन स्वनिर्मित आणि अप्रकाशित कविता ’मोगरा फुलला दीपावली अंक २०१०’ साठी पाठवू शकलात (http://www.mogaraafulalaa.com/2010/09/mogaraa-fulalaa-deepavali-ank-2010.html), तर फार आनंद होईल.

    धन्यवाद.

    ReplyDelete