निरगाठी
जातो मी माघारी
घर नाही साजेसे
अंदाज कशाला
प्रेमाचा अदमासे?
पात्याच्या भाजीचा
दरवळ येईना
भग्न तुळशीचा
कंठ दाटवेना
फिक्या रांगोळीचे
विस्कटते रंग
घायाळ पावले
लक्षुमी अपंग
दुधाची चरवी
घट्ट झाकणाची
कपिलेची माया
आटली सायीची
कैवार कोणाचा
घेऊ माझ्यासाठी?
आतून पोकळ
सुटत्या निरगाठी
No comments:
Post a Comment